चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0 12

मुंबई दि. 22 : चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टा कंपनीच्या कोळसा खाणींमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेतत्या प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश आज वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

             एकाही प्रकल्पग्रस्तावर अन्याय होणार नाही तसेच भरपाई आणि नोकरी मिळण्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कंपनीची कोळसा खाण आहे. या तालुक्यातील बरांज मोकासाचकबरांजसोमनाळाबोनथाळाकढोलीकेसुर्लीचिचोर्डीकिलोनीपिपरवाडी आदी गावातील 996.15 हेक्टरवरील 1254 खातेदार हे प्रकल्पग्रस्त आहेत. भूसंपादन पूर्ण झाले असले तरी अनेकांना अद्याप कंपनीने करारनाम्यात मान्य केलेल्या नोकऱ्या दिलेल्या नाहीत. तसेच 2015 पासून काही प्रकल्पग्रस्तांचे वेतन बंद करण्यात आले.

            प्रकल्पग्रस्तांवरील हा अन्याय दूर करण्यासाठीनोकरी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना योग्य वेतन द्यावेज्यांना नोकरी नको आहे त्यांना पाच लाख रुपयांची एकरकमी भरपाई देण्यात यावीज्यांच्या जमिनीचे व नोकऱ्यांचे प्रश्न शिल्लक असतील ते कालबद्धरित्या सोडवावेत आणि यानंतर जानेवारीत पुन्हा आढावा बैठक घेवून अहवाल द्यावा, असे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

            बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव अ‍सीमकुमार गुप्ताचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडासुभाष शिंदेतहसीलदार अनिकेत सोनावणेजिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.नेतामकेंद्रीय कामगार सह आयुक्त देवेंद्रकुमार, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सर्वश्री नरेंद्र जीवतोडेआकाश वानखडेगोपाळ गोस्वडेसंतोष नागपुरेसंजय रायविजय रणदिवेसंजय ढाकणेसुधीर बोढालेमारुती निखाळेविठोबा सालुरकरप्रवीण ठेंगणे, नामदेव डहुलेकर्नाटक एम्टा कंपनीचे टी. कृष्णगोंडा,  नरेंद्रकुमारडी.के. रामगौरव उपाध्येआर.बी.सिंग आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.