महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद




मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘ मिशन वात्सल्य ‘, ‘ मातृवंदना योजना ‘, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/







Source link