खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

बुलडाणा,(जिमाका) दि.12 : रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण असून प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने खातात. खाद्यप्रेमी अन्न सुरक्षा, स्वच्छता व पाैष्टिक पदार्थांना प्राध्यान्य देत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रमार्फत येथील सहकार विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात ‘संकल्प स्वच्छ आहार’उपक्रमांतर्गत खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राचे संचालक प्रिती चौधरी, मुख्यालय दिल्लीचे संचालक डॉ. रविंद्र सिंग, आयुष विभागाचे प्रा. डॉ. योगेश शिंदे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सहायक संचालक ज्योती हरणे, संचालक अजय खैरनार, निलेश धंदाळे, शुभांगी निकम आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्याला धाार्मिक व ऐतिहासिक स्थळाचा  वारसा लाभला आहे. या ठिकाणाला अनेक देशी व विदेशी पर्यटक भेटी देतात. त्यांना स्थानिक पदार्थांचे मोठे आकर्षण असतात. त्यामुळे या पदार्थांची मोठी मागणी होत असून स्थानिकांना लाभ होतो. पर्यटक अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राध्यान्य देतात. त्यामुळे प्रत्येक विक्रेतांनी स्वच्छता, सुरक्षतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.  प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या बाबीचा आपल्या व्यवसायात अवलंब करुन अन्न सुरक्षा मानकाचे पालन करावे. जिल्ह्यामध्ये अनेक पदार्थ नावलौकीक असून शेगांव कचोरीप्रमाणे नवनवीन प्रयोगातून पदार्थांची बँडींग करावी. खाद्य विक्रेतांसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. स्वनिधी योजनाच्या माध्यमातून अल्प दरात कर्ज उपलब्ध करुन दिला जातो. या योजनेचा लाभ घेऊन खाद्य विक्रेतांनी आपला व्यवसाय मोठा करावा. खाद्य विक्रेतांनी खाद्य पदार्थ तयार करणेपर्यंत सिमीत न राहता त्यांचे पॅकींग, मार्केटींग व बँडींगवर भर द्यावा.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाव्दारे देशभरात खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबवित आहे. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सर्व बचत गट, रस्त्यावरील खाद्य विक्रेतांनी लाभ घेऊन ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करुन द्यावे. जंग फुडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पोष्टीक व सात्वीक आहाराला देत असून केंद्र शासनही आयुष आहाराला प्रोत्साहन देत आहे. आयुष आहारामुळे विविध आजारांपासून बचाव असून शारीरिक, मानसिक स्वास्थासाठी आवश्यक आहे. त्यामुळे खाद्य विक्रेंते व बचत गटानी आयुष आहाराला प्राध्यान्य देऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करुन खाद्य विक्रेतांचे प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले. प्रशिक्षणाला आलेले विक्रेते व बचत गटातील महिलांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सेप्टी किटचे वाटप करुन उपस्थितांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात प्रतिज्ञा दिली.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे फोस्टॅक प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू व प्रियंका सूर्यवंशी यांनी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न भेसळ आणि अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राचे संचालक प्रिती चौधरी यांनी केले. तर सुत्रसंचालन सहायक संचालक अजय खैरनार यांनी केले. यावेळी बचत गटाच्या महिला व रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे 2000 पेक्षा जास्त विक्रेते सहभागी झाले होते.

Source link