माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर – महासंवाद




मुंबई,  दि. 27 :-माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

000

 







Source link